मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही! उद्धव गटाच्या मेळाव्यावरील बॅनर

128

शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचे लक्ष असले तरी व्यासपीठावर लिहिलेले ‘एकनिष्ठ’ हा शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आम्ही एकनिष्ठ, आम्ही एकनिष्ठ असे व्यासपीठाच्या खाली लिहिलेले असले तरी याठिकाणी एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर भावनिक संदेश दिला असून त्यावर ‘मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही’, तसेच मी माझ्या शिवसेनेला भाजपच्या दावणीला बांधणार नाही’, असे लिहिलेले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांचे प्रमुख लक्ष्य हे भाजपच असल्याचे दाखवून दिले.

उद्धव गटाचा शब्द एकनिष्ठ 

शिवसेनेचा परंपरांगत दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर होत असून शिवसेना शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलात (बीकेसी) होत आहे. शिवाजी पार्कवरील शिवसेना मेळाव्याच्या व्यासपीठावर एकनिष्ठ तर बीकेसीतील शिवसेना मेळाव्यात ‘गर्व सें कहों हम हिंदू है’ हे शब्द सर्वांचे लक्ष वेधून घेत असून उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचार सोडून दिल्यानंतर शिंदे यांनी आपल्या मेळाव्यात हिंदुत्वाचा पुरस्कार करत मेळावा आयोजित केल्याने उध्दव ठाकरे यांना आपल्याच एकनिष्ठेच्या नावाखाली अडकून ठेवल्याचे पहायला मिळत आहे.

(हेही वाचा मेळाव्याच्या आधी एकनाथ शिंदेंचे सूचक ट्विट)

भाजपवरील राग काढला

या शिवाजी पार्कच्या व्यासपीठाच्या खाली एक पोस्टर असून त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. या फोटोच्या वर मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही असेच त्यावर लिहित संदेश देण्यात आहे. शिंदे गटाला शिवसेनेपासून बाजुला करण्यात भाजपची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे भाजपच्या मदतीने या शिवसेनेसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले आणि त्यामुळे ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले होते.  त्यामुळे भाजपवरील राग आता या सभेतून व्यक्त होत असून बाळासाहेबांचे हे उद्गारच या बॅनरद्वारे प्रदर्शित करत शिवसैनिकांना भाजपच्या विरोधात राग निर्माण करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.