दसऱ्याच्या दिवशी यंदा उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्क येथे मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे, तर दुसरीकडे शिंदे गटाचा बीकेसी येथे मेळावा होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मेळावे एकाच वेळी सुरु झाले तर नक्की ऐकायचे कुणाला असा प्रश्न निर्माण झाला तर काय करणार, या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अफलातून मार्ग काढला आहे.
अजित पवारांनी चिमटा काढला…
दोन्ही गटाकडून त्यांच्या त्यांच्या मेळाव्यांचे टीझरही लॉंच झाले आहेत. दोन्ही मेळाव्यांच्या वेळाही जवळपास सारख्याच असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रसार माध्यमांनी ‘कोणाचे भाषण ऐकणार’, असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत मिश्किल उत्तर दिले. दसरा मेळाव्याला कोणाचेही भाषण ऐकले आणि एकाच वेळी दोन्ही भाषणे सुरु झाली तर उद्धव ठाकरेंचे भाषण पहिल्यांदा ऐकू. मग एकनाथरावांचे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच प्रसारमाध्यमांना टोला लगावत, तुम्ही रिपीट करतच असता. तुमचे कामच आहे. त्यामुळे दुसरे चॅनेल लावायचे आणि दुसरे भाषण ऐकायचे. यात काय? अर्धा तास पुढे मागे झाले तरी बिघडले कुठे? दिल्लीचे कसे दाखवत होता. एकीकडे उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु होते. ते भाषण झाल्यानंतर तुम्ही एकनाथरावांचे भाषण दाखवले. त्यात तुम्ही तरबेज आहात. आम्ही बघणार काही काळजी करण्याचे कारण नाही, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.
Join Our WhatsApp Community