दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेची होणार ग्रँड एन्ट्री; कोणती आहेत वैशिष्ट्ये?

99
गुरुवारी, ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली, त्यामुळे यंदा दोन दसरा मेळावा होणार आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा विशेष चर्चेत आला आहे. कारण मुख्यमंत्री शिंदे यांची मेळाव्याच्या ठिकाणी प्रवेश हा विशिष्ट पद्धतीने होणार आहेच, पण व्यासपीठावर आणखी एक वस्तू लोकांचे लक्ष वेधून घेणार आहे.
दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाने अभूतपूर्व नियोजन केले आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. 10 हजारांहून अधिक एसटी बस गाड्या, खासगी बस गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो कार्यकर्ते दोन्ही मेळाव्यांसाठी जमवले जात आहेत. मुंबईत दसऱ्याला सुट्टी असल्याने इतर वाहनांची संख्या कमी असेल असे गृहीत धरून लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातून मुंबईत आणण्याचे नियोजन आहे. एवढी मोठी गर्दी आवरण्याचे आणि त्याचवेळी कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. शिवसेनेतून फूटल्यानंतर शिंदे गटाचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाने मेगाप्लान आखला आहे.

शिंदे गटाच्या मेळाव्याचे आकर्षण 

दसऱ्या मेळाव्यासाठी शिंदे गटाने ग्रँड प्लान आखला आहे. या मेळाव्यात  51 फुटी तलवारीचे पूजन होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यात तलवारीचे शस्त्रपूजन होईल. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यातर्फे मुख्यमंत्र्यांना 12 फुटी चांदीची तलवार भेट देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.