भाजपला देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबाची काळजी आहे. (Narendra Modi) आमचे संपूर्ण लक्ष लोकांना चांगले जीवन आणि संधी देण्यावर आहे. परंतु घराणेशाही पक्ष केवळ आपल्या कुटुंबाच्या कल्याणात गुंतले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तेतेलंगणातील महबूबनगर येथे जाहीर सभेला संबोधित करताना बोलत होते. या वेळी नरेंद्र मोदी यांनी राज्यातील के चंद्रशेखर राव (KCR) सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली. (Narendra Modi)
(हेही वाचा – Asian Games : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कमाई; तेजिंदरपाल सिंग आणि अविनाश साबळे यांच्या कष्टाचे चीज)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणा राज्यात १३,५०० कोटी रुपयांच्या अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच पंतप्रधान मोदींनी नागपूर-विजयवाडा या इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक भाग असलेल्या रस्ते प्रकल्पांची देखील पायाभरणी केली. या रस्ते प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग 163G च्या वारंगल ते खम्ममपर्यंत १०८ किमी लांबीचा चौपदरी ग्रीनफिल्ड महामार्ग आणि खम्मम ते विजयवाडापर्यंत ९० किमीच्या चौपदरी ग्रीन फिल्ड महामार्गाचा समावेश करण्यात आला आहे. (Narendra Modi)
In Mahabubnagar, launching initiatives and laying the foundation stones for projects that will significantly improve Telangana’s infrastructure and connectivity. https://t.co/mz4vP5EXne
— Narendra Modi (@narendramodi) October 1, 2023
जाहीर सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम देशवासियांना स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘आज सकाळी स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. मी देशवासियांना आवाहन करतो की, स्वच्छता कार्यक्रमात सहभागी व्हा आणि या मोहिमेत सहभागी होण्यासाठी एक तास काढा’, असे मोदी म्हणाले.
अलिकडच्या वर्षांत तेलंगणातील जनतेने लोकसभा, विधानसभा आणि नागरी निवडणुकांमध्ये भाजपला बळ दिले आहे. आज येथे दिसणाऱ्या गर्दीतून मला विश्वास आहे की, तेलंगणातील जनतेने परिवर्तनाचा संकल्प पक्का केला आहे. तेलंगणाला बदल हवा आहे, कारण राज्याला भ्रष्टाचाराची नव्हे तर पारदर्शक आणि प्रामाणिक सरकारची गरज आहे. तसेच, तेलंगणाला जमिनीवर काम करण्याची आणि भाजप सरकारची गरज आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. (Narendra Modi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community