Amit Shah : राजकारणात घराणेशाही म्हणजे विष – अमित शहा यांचा हल्लाबोल

137

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असताना विरोधकांवर सडकून टीका केली. घराणेशाहीचे राजकारण हे विष असल्याचे सांगत या व्यवस्थेत पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाखालील सरकारचे नियंत्रण फक्त एकाच कुटुंबाच्या हातात राहते, असा हल्लाबोल केला.

मध्य प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये जातीवादाचे विष पसरवण्यासाठी 2015 पासून काँग्रेसने जाती आधारित आंदोलने पुरस्कृत केल्याचा आरोपही त्यांनी केला. एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, मला कोणत्याही नेत्याचे नाव घ्यायचे नाही, परंतु काँग्रेस, सपा, द्रमुक, शिवसेना (यूबीटी) यांचे घराणेशाहीचे राजकारण म्हणजे, पक्षात एकच कुटुंब आहे आणि सरकारही त्यांचेच. यालाच घराणेशाही म्हणतात.

(हेही वाचा Pakistani : पाकिस्तानमध्ये सात दिवसांत दुसरा मोठा दहशतवादी हल्ला; ११ मजूर ठार)

भाजप नेत्यांच्या कुटुंबियांना तिकीट दिल्याचा बचाव करत अमित शाह म्हणाले, गुणवत्तेच्या आधारेच तिकीट दिले आहे. घराणेशाही विष आहे. पक्ष एकाच कुटुंबापुरता मर्यादित राहिल्यास तळागाळातून येणाऱ्यांना काय स्थान असेल? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शहा पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. मी पक्षाचा अध्यक्ष झालो, माझ्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हते. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. शिवराजसिंह चौहान यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. काँग्रेसचा अजेंडा समजून घ्या. पक्ष आणि सत्तेवर एकाच कुटुंबाचे वर्चस्व, यालाच घराणेशाही म्हणतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.