Dynasty In Politics : धारावीत काँग्रेस घराणेशाही; कार्यकर्त्यांमध्ये चिड

143
Dynasty In Politics : धारावीत काँग्रेस घराणेशाही; कार्यकर्त्यांमध्ये चिड

काँग्रेसच्या घराणेशाहीचा फटका आता मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बसू लागला आहे. ही घराणेशाही दुसऱ्या-तिसऱ्याकडून लादली जात नसून खुद्द मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडून असल्याने धारावी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चिड व्यक्त होत आहे. (Dynasty In Politics)

वडील २० वर्षे आमदार

वर्षा गायकवाड यांचे वडील दिवंगत एकनाथ गायकवाड यांनी १९८५ पासून चार वेळा धारावी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून १९९९ ते २००४ मध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवले आहे. तसेच त्यानंतर त्यांनी २००४ आणि २००९ ला लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकले.

(हेही वाचा – इंडी आघाडी म्हणजे बलात्कारी बचाव आघाडी; Prem Shukla यांचा हल्लाबोल)

वडील खासदार, मुलगी आमदार

खासदार झाल्यानंतर २००४ मध्ये धारावी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ गायकवाड यांची २९ वर्षीय कन्या वर्षा यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि तेव्हापासून सलग चार विधानसभा निवडणुकीला वर्षा गायकवाड निवडून आल्या. २०१० ते २०१४ या कालावधीत त्यांनी महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम केले तर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये त्यांनी शालेय शिक्षण खात्याचा कार्यभार सांभाळला.

२०१७ ते २०२० या काळात एकनाथ गायकवाड यांची मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्ष होते तर गेल्या वर्षी जून २०२३ मध्ये वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

(हेही वाचा – राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व; Subramaniam Swamy यांनी दिले पुरावे)

आमदारकीचा राजीनामा

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि महायुतीचे उज्ज्वल निकम यांचा पराभव करत वर्षा यांनी लोकसभेत प्रवेश मिळवला. त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. (Dynasty In Politics)

मतदार संघ ४० वर्षांनंतर मुक्त

पुढील दोन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तब्बल ४० वर्षांनंतर गायकवाड घराण्याकडून मुक्त झालेल्या धारावी मतदारसंघात निवडणूकीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ लागली आणि १७ कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करत पक्षाकडे अनामत रक्कम आणि अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांचे स्वप्न आकार घेण्यापूर्वीच उद्ध्वस्त होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

(हेही वाचा – मुख्‍यमंत्री पदावरुन उबाठाचे तारे जमी पर; Ashish Shelar यांनी लगावला टोला)

बहीण तयार

वर्षा यांची बहीण ज्योती गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून पेशाने डॉक्टर असलेल्या ज्योती या आठवडाभरापासून धारावी मतदारसंघात अचानक राजकीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊ लागल्या आहेत. विभागात त्यांचे पोस्टर्सही झळकू लागले आहेत. बहीण मुंबई अध्यक्ष असल्याने ज्योती यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. (Dynasty In Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.