शिवसेनेतील बंडाळीची परंपरा जुनीच

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा फुटलेल्या शिवसेनेच्या इतिहासाला उजाळा मिळाला. या पूर्वी छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी आजवर शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात आमदार फुटण्याची शिवसेनेतील ही पाचवी घटना असून अशाप्रकारे बंडाळीची परंपराच शिवसेनेत असल्याचे दिसून येते.

शिवसेनेतील बंडाळीची परंपरा जुनीच

शिवसेनेचे नेते असलेले छगन भुजबळ यांनी १९९१मध्ये प्रथम शिवसेना सोडली होती. मनोहर जोशी यांना मानाचे पान दिले जात असल्याने छगन भुजबळ यांनी शिवसेना पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ९ आमदारांसह प्रवेश केला होता. छगन भुजबळ यांच्यानंतर शिवसेनेचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनीही शिवसेना पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

मात्र, नाईक यांच्यानंतर उध्दव ठाकरे यांच्याशी पटत नसल्याने २००५मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना सरकारमध्ये महसूल मंत्रीपद बहाल करण्यात आले होते. राणे यांच्यासोबत कालिदास कोळंबकर, शाम सावंत, शंकर कांबळी यांच्यासह ११ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

( हेही वाचा : मंत्री अनिल परब यांची १० तासांपासून ईडीची चौकशी )

मात्र, त्याच वर्षी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेल्या राज ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखांच्या आसपासच्या बडव्यांविरोधात बंड करत ते शिवसेनेतून बाहेर पडले होते. आमदार बाळा नांदगावकर यांच्यासह राज ठाकरे हे आपल्या समर्थकांसह शिवसेनेतून बाजुला स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनंतर शिवसेनेत बंडाळी निर्माण झाली असून आजवरच्या बंडापेक्षा सर्वांत मोठा बंड मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह ३५ आमदार फुटले जाणार असून आजवरच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात आमदार फुटण्याची मोठी घटना मानली जात आहे. त्यामुळे शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर सर्व प्रथम माधव देशपांडे आणि बंडू शिंगरे यांनी शिवसेनेला राम राम केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here