शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याने मनसेला दुःख, काय म्हणतात मनसे नेते?

141

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली, ५६ वर्षांच्या शिवसेनेला १९८४-८५ मध्ये धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले होते, त्यानंतर या चिन्हावर शिवसेनेने अनेक निवडणूक लढवल्या, मात्र ३८ वर्षांनंतर शिवसेनेचे हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची वेळ आली. याचे अनेक राजकीय नेत्याने दुःख झाले, त्यातील एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आहेत, असे मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणाले. निवडणूक आयोगाचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असला तरी एखाद्या पक्षावर ही वेळ यावी ही दु:खद घटना आहे. याचे कुठेही राजकीय भांडवल करावे हा माझ्या नेत्याचा स्वभाव नाही, असे महाजन म्हणाले.

काय म्हणाले प्रकाश महाजन? 

शिवसेनेवर नामुष्कीची वेळ आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. निष्पाप असल्याचे बुरखा पांघरतात. राजकारणात शपथा घेऊन चालत नसते. मृत माता-पित्याचा आधार घ्यावा लागला. सल्लागार चुकीचा असल्यावर काय होऊ शकते हे उद्धव ठाकरे उदाहरण आहेत अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. प्रकाश महाजन म्हणाले की, आज बाळासाहेबांनी कष्टाने शिवसेना पक्ष उभा केला आहे. राज ठाकरेही आनंदित झाले नसतील. परंतु उद्धव ठाकरे अहंकारात बुडाले होते. राजकारणात डावपेच सुरू असतात. आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ज्यांना जायचे त्यांनी जा, दरवाजे उघडे आहेत अशी भाषा वापरली. प्रत्येक जण चुकीचा हे बरोबर असे होत नाही असे त्यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे धनुष्यबाण गोठवल्याने दु:खीच असतील. राजकारण राजकारणासारखे असते. राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा कित्येक आमदार, नगरसेवक त्यांच्यासोबत येणार होते. परंतु कधीच कुणाला बोलावले नाही. राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाण, शिवसेनेवर अधिकार सांगितला नाही. सेनापती कुशल, लोकप्रिय असेल तर पराभवातून उभे राहून विजय मिळवू शकतो. सेनापती कटकारस्थान करणारा असेल तर तो उभे राहू शकत नाही असा खोचक टोलाही मनसेने उद्धव ठाकरेंना लगावला.

(हेही वाचा धनुष्यबाण चिन्ह आयोगाने गोठवल्यानंतर, आता ‘या’ नावावर केला दोन्ही गटांनी दावा )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.