Jharkhand च्या पोलीस महासंचालकांना पदावरून हटवले, निवडणुक आयोगाचा निर्णय

52
Jharkhand च्या पोलीस महासंचालकांना पदावरून हटवले, निवडणुक आयोगाचा निर्णय
Jharkhand च्या पोलीस महासंचालकांना पदावरून हटवले, निवडणुक आयोगाचा निर्णय

केंद्रीय निवडणुक आयोगाने झारखंडचे (Jharkhand) पोलिस महासंचालक अनुराग गुप्ता (Anurag Gupta) यांना पदावरून तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षपातीपणाच्या आरोपामुळे त्यांना हटवण्यात आल्याची चर्चा आहे. त्याच्या जागी आता वरिष्ठ डीजीपी स्तरावरील अधिकाऱ्याला जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच आयोगाने राज्य सरकारला या सूचनांचे शिस्तपालन अहवाल दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत सादर करण्यास सांगितला आहे. त्यामुळे झारखंडच्या विधानसभा निवडणुकीआधी आयोगाने घेतलेला मोठा निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

अनुराग गुप्ता यांना पदावरून का हटवले?

गुप्ता (Anurag Gupta) यांच्याविरोधात मागील निवडणुकांदरम्यान आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांना पदावरून हटवण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झारखंड (Jharkhand) मुक्ती मोर्चासोबत पक्षपाती वर्तन केल्याच्या आरोपानंतर गुप्तांना (Anurag Gupta) कर्तव्यातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच त्यांना दिल्लीतील निवासी आयुक्त कार्यालयात पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान झारखंडमध्ये निवडणुक प्रक्रिया पूर्ण होऊपर्यंत त्यांना झारखंडला परत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. गुप्ता यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर समितीद्वारे चौकशी करण्यात आली. त्यानंतर चौकशीत समितीच्या निष्कर्षानंतर आरोपपत्र जारी करत, वरील आदेश देण्यात आला. (Jharkhand)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.