शिवसेनेला ‘कांदे’ महागात पडले, या कारणांमुळे बाद झाले मत

137

एखाद्या क्रिकेटच्या सामन्यातील सुपर ओव्हर सारखाच थरार राज्याच्या राज्यसभा निवडणुकीत पहायला मिळाला.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार याची सर्व नेते आणि जनता मध्यरात्रीपर्यंत वाट बघत होती. पण अखेर निकाल हाती आला आणि भाजपचे तीन आणि मविआचे तीन उमेदवार निवडून आले.

(हेही वाचा: राज्यसभा निवडणुकीचा चित्तथरारक निकाल, कोल्हापूरच्या ‘या’ मल्लानं अखेर मारलं मैदान)

या निकालामुळे मविआला आणि प्रामुख्याने शिवसेनेला धक्का बसलाच. पण त्याआधी त्यांना धक्का बसला तो त्यांच्या एका आमदाराचं मत बाद झाल्याचा. निवडणूक आयोगाने शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत बाद ठरवलं आणि त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढणार का, अशा चर्चांना सुरुवात झाली. भाजपने घेतलेल्या आक्षेपाची आयोगाने दखल घेत विधान भवनातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले. पण हे मत बाद होण्यामागची नेमकी कारणे कोणती?

का झाले कांदेंचे मत बाद?

  • मतदान करताना मतदारानं मतपत्रिकेची घडी घालणं आवश्यक असतानाही कांदेंनी मतपत्रिकेची घडी घातली नाही आणि त्यामुळे त्यांची मतपत्रिका सर्वांना दिसली
  • मतदान कक्षाच्या बाहेरुन कांदे यांनी आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवली
  • त्यानंतर निवडणूक अधिका-यांनी त्यांना मतदानासाठी निवडणूक कक्षात जाण्यास सांगितलं
  • मतदानावेळी सुहास कांदे यांनी काही जणांशी संवाद साधला

(हेही वाचा: Rajya Sabha Election 2022: असा होता राज्यसभा निवडणुकीचा ‘नाट्यमय’ घटनाक्रम)

यांची मते वैध

भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार यांच्या मतांबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता. तर महाविकास आघाडीने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांची मतं बाद करण्याची मागणी केली होती. पण यापैकी केवळ सुहास कांदे यांचं मत अवैध असून, इतर सर्व मते वैध असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.