कोठडीनंतरही नवाबांना ‘महा’पाठिंबा, तर राजीनाम्यासाठी भाजपचं आंदोलन

151

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी 8 तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. या अटकेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तसेच गुरुवारी जर नवाब मलिक यांची सूटका झाली नाही, तर आंदोलन तिव्र करण्याचा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे.

भाजपाचे आंदोलन

नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपकडून आजपासून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. मलिकांना अटक करण्यात प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे मलिक राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

राजीनामा घेणार नाही

तीन मार्चपर्यंत ईडी कोठडी मिळालेल्या नवाब मलिकांचं मंत्रिपद कायम ठेवण्याचा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे. बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आज मंत्रालयाजवळ महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार आंदोलन करणार आहे. तर, शुक्रवापासून जिल्हा पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे.

( हेही वाचा: बापरे! बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आगीत जळून खाक! )

हे आहे प्रकरण

मनी लॉण्डरिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली, त्यानंतर त्यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. रोजची औषधं सोबत बाळगण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच घरचे जेवण आणि चौकशी दरम्यान वकिल सोबत बाळगण्याकरता अर्ज सादर करण्यात आला आला, त्यावर गुरुवारी, २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.