‘झुकेगा नही…’ म्हणणारा काँग्रेसचा नेता पोलिसांना घाबरून पळाला 

134

सध्या नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याचा निषेध करत दिल्लीत काँग्रेस कार्यकर्ते जोरदार निदर्शने करत होते. त्यावेळी काँग्रेसचा युवक काँग्रेसचा अध्यक्षही निदर्शने करत होता, त्यावेळी सुरुवातीला ‘आम्ही पोलिसांना घाबरत नाही’, असे छातीठोकपणे सांगणारा हा नेता प्रत्यक्षात जेव्हा पोलिसांनी कारवाई सुरु केली तेव्हा धूम ठोकून पळाला, तसा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

ईडीच्या कार्यालयासमोर निदर्शने! 

नॅशनल हेराल्डप्रकरणी २ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सध्या गांधी घराण्यावर होत आहे. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने समन्स बजावले आहे. सोमवारी, १३ जून रोजी राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. यावेळी राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यालयापासून ईडी ऑफिसपर्यंत प्रदर्शन केले. त्यात काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते. यावेळी घडलेल्या एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

(हेही वाचा गांधी घराण्याची झोप उडवणारे नॅशनल हेराल्ड प्रकरण आहे तरी काय?)

काय आहे तो व्हिडीओ?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीवी श्रीनिवास निषेध आंदोलन करताना एका माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आम्ही राहुल गांधींचे कार्यकर्ते आहोत. अटक अथवा पोलिसांच्या लाठीला घाबरणारे नाही. त्यानंतर काही वेळात सोशल मीडियात श्रीनिवास यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते पोलिसांच्या हातातून निसटून पोबारा करताना दिसून आले. भारतीय जनता युवा मोर्चाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.