शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने दुसऱ्यांदा दिलेल्या समन्सनंतर राऊत हे शुक्रवारी, १ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर झाले. दुपारी १२ वाजता राऊत ईडीच्या कार्यालयात हजर झाले, त्यानंतर तब्बल १० तास चौकशीनंतर त्यांना ईडीच्या कार्यालयातून बाहेर सोडण्यात आले. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही चौकशी करण्यात आली. ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांनी आपण उत्तरे दिली आहेत. ईडीला पुन्हा माझी चौकशी करायची असेल तर आपण हजर राहू, असेही संजय राऊत म्हणाले.
ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी संजय राऊत यांनी ‘मी पळपुटा नाही. माझा देशातील केंद्रीय संस्था आणि ईडीवर विश्वास आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोर जाण्याची हिम्मत आहे. राज्याचा खासदार, नागरिक म्हणून या केंद्रीय संस्थाना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी निर्भय आहे, निडर असल्याने बेधडकपणे ईडीच्या कारवाईला समोर जाणार आहे. मी कधीच चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मी बेडरपणे ईडी चौकशीला सामोरा जाणार आहे. ईडी सारख्या संस्थांना हाताशी धरून सुडाचे राजकारण केले जात आहे, यामुळे लोकशाही धोक्यात आहे, असे राऊत म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community