राज्याचे माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेनेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने धाड टाकली, त्यानंतर तब्बल साडे नऊ तास चौकशी केली. त्यानंतर हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावली आहे.
ईडीकडून गेल्या दीड महिन्यापासून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात कारवाई केली जात आहे. या दीड महिन्यात ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडी टाकल्या. ईडीच्या पथकाने सकाळीच मुश्रीफांच्या घरी छापा टाकलेला. तब्बल साडेनऊ तास ईडीचे पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत होते, हे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडले. यानंतर हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी, 13 मार्च रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ चौकशीला सामोरे जातात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांना याआधीदेखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. विशेष म्हणजे या छापेमारीदरम्यान मुश्रीफ हे नॉट रिचेबल आहेत.
(हेही वाचा H3N2 Influenza : मास्क रिटर्न; नीती आयोगाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय)
Join Our WhatsApp Community