अनिल परबांच्या अडचणीत वाढ! ईडीकडून १० कोटी २० लाखांची संपत्ती जप्त

185

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांच्या १० कोटी २० लाखांच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही साई रिसॉर्टशी संबंधिक असल्याची माहिती मिळाली आहे.

( हेही वाचा : Mahavitaran Strike : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे)

ईडीने दिलेल्या माहितीनुसार १० कोटी २० लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ईडीने साई रिसॉर्ट एनएक्स आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. संलग्न मालमत्ता जमिनीच्या स्वरुपात (अंदाजे ४२ गुंठा मोजून) गट क्रमांक ४४६, मुरुड, दापोली, रत्नागिरी येथे आहे. ज्याची किंमत २,७३,९१,००० रुपये आहे आणि साई रिसॉर्ट एनएक्स या रिसॉर्टवर बांधण्यात आले आहे. ७,४६,४७,००० रुपये किंमतीची जमीन आहे.

परबांचे सदानंद कदम यांच्याशी सामंजस्य, तपासात निष्पन्न

पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब, मेसर्स साई रिसॉर्ट, मेसर्स सी शंख रिसॉर्ट आणि इतरांविरुद्ध दापोली न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत तपास सुरू केला आहे. पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 च्या विविध कलमांचे उल्लंघन. दापोली पोलीस ठाण्यात परब यांच्या विरुद्ध एक एफआयआर देखील नोंदवला होता. दरम्यान, ईडीच्या चौकशीतून हे समोर आले की, परब यांचे सदानंद कदम यांच्याशी सामंजस्य आहे. त्यातूनच कदम यांना स्थानिक एसडीओ कार्यालयातून बेकायदा परवानगी मिळाली. त्यानुसार शेतजमिनीचं बिगरशेत जमिनीत रुपांतर करण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करत रिसॉर्टचे बांधकाम झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.