नॅशनल हेराल्ड प्रकरण; आता पुन्हा लोकतंत्र धोक्यात येईल

91

ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी खूप मोठी कारवाई केली आहे. केंद्रीय एजन्सीने दिल्लीतील हेराल्ड हाऊस सील केले आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर ही कारवाई ईडीने केली आहे.

( हेही वाचा : गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मनसेकडून मोफत बस )

आता आपल्याला पुन्हा एकदा देश धोक्यात आल्याची जाणीव होणार आहे. गांधी कुटुंब म्हणजे देश असा विचित्र समज या लोकांनी करुन घेतल्यामुळे देशात गेली ७० वर्षे खूप मोठा गोंधळ माजलेला आहे. लोकशाही म्हणजे गांधी कुटुंब, सेक्युलरिज्म म्हणजे गांधी कुटुंब, तिरंगा म्हणजे गांधी कुटुंब असा विचित्र समज कॉंग्रेसी लोकांनी करुन घेतला आहे.

तुमच्या फायद्यासाठी देशाला धारेवर धरु नका…

त्यामुळे ज्यावेळी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोललं जातं तेव्हा सोनिया गांधी यांच्या शब्दांत लोकतंत्र धोक्यात येतं. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलवलं असताना या कॉंग्रेसी लोकांनी देशात निरर्थक आंदोलने केली. देशात हुकुमशाही असल्याचा आरोप केला. पहिली गोष्ट समजा उद्या भ्रष्टाचाराचा गुन्हा सिद्ध झाल्यावर माय-लेक जेलमध्ये गेले तरी देशाला काही फरक पडणार नाही. भ्रष्टाचारी आत गेल्यामुळे कदाचित आनंद होईल, दुःख तर मुळीच होणार नाही.

या कारवाईमुळे कदाचित कॉंग्रेसकडून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. संविधानाचं नाव घेत स्वतःला देशापेक्षा मोठं ठरवण्याचा प्रयत्न होईल, पुन्हा एकदा आंदोलने सुरु होतील, नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा बदनाम करण्याचे डाव रचले जातील. त्यामुळे आता भारतवासीयांनी सावधान राहिले पाहिजे. यांच्या भुलथापांना जनता आता बळी पडत नाहीच, पण आता यांना ठणकावून सांगितलं पाहिजे की, तुमच्या फायद्यासाठी देशाला धारेवर धरु नका.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.