अनिल परबांना पुन्हा ईडीचे समन्स! चौकशीला सामोरे जाणार?

100 कोटींच्या कथित वसुली संदर्भात चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीकडून दुस-यांदा समन्स बजावण्यात आले आहे. 28 सप्टेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.

मनी लाँन्ड्रिंगच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीकडून हे समन्स बजावण्यात आले आहे. याआधी 28 ऑगस्ट रोजी त्यांना ईडीकडून पहिल्यांदा समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी परब यांनी दोन आठवड्यांची मुदत मागून घेतली होती. त्यामुळे आता दुस-यांदा समन्स पाठवल्यानंतर अनिल परब चौकशीला सामोरे जातात का, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या परीक्षा अचानक रद्द! काय आहे कारण? वाचा)

काय म्हणाले होते परब?

मला २८ ऑगस्टला ईडी कार्यालयाकडून नोटीस मिळाली. त्यात ३१ ऑगस्टला ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र या दिवशी माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी चौकशीला हजर राहू शकत नाही, त्यामुळे दोन आठवड्यांनंतरची वेळ देण्यात यावी. मला पाठवलेल्या नोटीशीत कशा संदर्भात चौकशी करायची आहे, याचे कारण लिहिलेले नाही. त्यामुळे चौकशीचे कारण स्पष्ट करावे. तसे केल्यास मला चौकशीत योग्य ती माहिती देता येईल, असेही परब यांनी ईडीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here