अविनाश भोसले यांना ईडीचे समन्स

सरकारी जमिनीवर केलेल्या बांधकामाबाबत पुण्यात अविनाश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

179

पुण्यातील बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांना सक्तवसुली संचलनायल (ईडी) कडून गुरुवारी समन्स बजावण्यात आले आहे. शुक्रवारी त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.

शुक्रवारी ईडीच्या कार्यलायत हजर राहण्यास सांगितले!

सरकारी जमिनीवर केलेल्या बांधकामाबाबत पुण्यात अविनाश भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अविनाश भोसले आणि मुलगा अमित भोसले यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याचे समजते. हा गुन्हा रद्द करण्यासाठी अविनाश भोसले यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना दिलासा न दिल्यामुळे ईडीकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले असल्याचे समजते. शुक्रवारी त्यांना ईडीच्या कार्यलायत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा : अग्निशमन सेवा शुल्काच्या वसुलीच्या परिपत्रकाला स्थायी समितीची स्थगिती)

40 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. काही आठवड्यापूर्वी अविनाश भोसले यांच्यावर ईडीने फेमा कायद्यांतर्गत कारवाई करत पुणे आणि नागपूर येथील ४० कोटी ३६ लाख रुपयांची संपत्तीवर जप्ती आली आणली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.