ईडीचा गोंधळ; मुश्रीफांच्या घराऐवजी भलत्याच घरी टाकली धाड

86

गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे घर, कार्यालये, त्यांचे नातेवाईक, सहकारी यांच्या घरांवर धाडसत्र सुरु केले. त्यामुळे बुधवारी, ११ जानेवारी रोजी सकाळपासून मुश्रीफ चर्चेत आले. मात्र या धाडसत्रात ईडीचा गोंधळ उडाला. मुश्रीफांचे घर समजून ईडीने भलत्याच उद्योगपतीच्या घरावर धाड टाकली. ज्यामुळे पुरता गोंधळ उडाला.

काय नेमके घडले? 

ईडीचे अधिकारी बुधवारी मुश्रीफ यांच्या घरी घुसण्याआधी भल्या पहाटे एका भलत्याच उद्योगपतीच्या घरात शिरले. त्या उद्योगपतीच्या घरी गेल्यानंतर आपण चुकीच्या घरी छापा टाकत आहोत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि सकाळी सहाच्या सुमारास ते हसन मुश्रीफ यांच्या घरी धडकले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीचे जवळपास 20 अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले होते. या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरुवात झाली. त्याआधी ईडीचे अधिकारी मुश्रीफांचे घर समजून दुसऱ्याच व्यावसायिकाच्या घरी घुसले होते, ज्यामुळे ईडीचे अधिकारी चर्चेत आले.

(हेही वाचा शिवसेनेचा कारभार पक्षाच्या घटनेनुसारच चालतो का; ठाकरे गटाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.