मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना अटकेपासून दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा दिला नाही.त्यानंतर गुरुवार, २१ मार्च रोजी ED चे अधिकारी अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तिथे त्यांची चौकशी होणार आहे. त्यानंतर केजरीवाल यांना केव्हाही अटक होऊ शकते, अशी परिस्थिती आहे.
21 मार्च दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने आम्ही अटकेबाबत कोणतीही अंतरिम सुरक्षा देऊ शकत नाही, असे म्हटले. तसेच न्यायालयाने ईडीला उत्तर देण्यास आणि नवीन अंतरिम याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणी 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. ED ने इतके समन्स बजावले तेव्हा केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी अटकपूर्व जामीन अर्ज का केला नाही, अशी विचारणा केली. ED ने 17 मार्च रोजी त्यांना ९वे समन्स बजावले. केजरीवाल यांनी १९ मार्च रोजी या समन्सविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर २० मार्च रोजी सुनावणी झाली.
यावेळी केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांचे वकील म्हणाले, सुरक्षा मिळाल्यास मुख्यमंत्री केजरीवाल हजर होतील. 20 मार्च रोजी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि विक्रम चौधरी यांनी केजरीवाल यांची बाजू न्यायालयात मांडली. तेव्हा ते म्हणाले, ईडीने आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. तपास यंत्रणा केजरीवाल यांनाही अटक करू शकते. केजरीवाल (CM Arvind Kejriwal) पळून जात नाहीत. त्यांना सुरक्षा दिली तर ते पुढे येतील. जरी ईडी त्यांना आरोपी, संशयित किंवा साक्षीदार म्हणून बोलावत आहे की नाही हे सांगत नाही. त्यावर न्यायालयाने म्हटले होते की, ते हजर झाल्यावरच समजेल की त्यांना आरोपी म्हणून बोलावले जात आहे की साक्षीदार म्हणून.
De
Join Our WhatsApp Community