राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, जामिनाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

132

शिवसेना खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जामिनाविरोधात ईडीने तत्काळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याच्या ईडीच्या मागणीस नकार दिल्याने राऊतांचा जेल बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राऊत यांच्या जामिनाच्या निर्णयाचे पत्र साडे पाच वाजण्याच्या आधीच जेलच्या पत्रपेटीत पोहोचल्याने राऊत थोड्या वेळातचम म्हणजे बुधवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेल बाहेर येतील, अशी माहिती त्यांचे भाऊ प्रविण राऊत यांनी दिली आहे. जेल बाहेर आल्यानंतर राऊत हे दादर येथील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला जाणार असून त्यानंतर ते बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.

(हेही वाचा – अंदमानातील सावरकर कोठडीतील इतिहास खरवडून काढला, कोण आहे दोषी?)

पीएमएलए कोर्टानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही संजय राऊत यांच्या जामिनावरील स्थगिती नाकारली आहे. यामुळे संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून ते आजच बुधवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जेल बाहेर येणार आहेत. राऊतांच्या जामीन अर्जावर अद्याप मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, राऊतांच्या सुटकेचे आदेश जेलबाहेरील पेटील टाकण्याची प्रक्रिया झाली आहे. अशातच दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू असताना ईडीने न्यायालयाला वेळ शिल्लक नसताना सुनावणीसाठी आग्रही असणं कितपत योग्य आहे, असा सवाल विचारला आहे.

संजय राऊतांचे वकील अभात फोंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्र न्यायालयाने राऊतांचा जामीन मंजूर केल्यानंतर कोर्टाच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून मेमो सादर केला आहे, यानंतर जेल प्रशासन त्यांची प्रक्रिया पूर्ण करून राऊतांना संध्याकाळी सातवाजेपर्यंत बाहेर सोडतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.