१० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारात अनिल देशमुखांच्या कुटुंबियांचाही सहभाग?

197

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चुलत भावाच्या सह-मालकीच्या कंपनीची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) १०.९ कोटी रुपयांच्या कथित व्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. हा व्यवहार ईडीला संशयास्पद वाटत आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमांतून बेकायदेशीर रक्कम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही देण्यात आली आहे, असाही संशय ईडीला आहे.

सत्यजित देशमुखांची कंपनी टार्गेट 

या प्रकरणी ईडीकडून प्रामुख्याने इनोव्हेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हॉईसर प्रा. लि. या कंपनीची चौकशी केली जात आहे. ही कंपनी सत्यजित देशमुख यांच्या मालकीची आहे. ही कंपनी वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून दुबईच्या लुईस बर्जर कंपनीसोबत सह कंत्राटदार म्हणून काम करत आहे. तसेच ही कंपनी मुंबई कोस्टल रोड आणि मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे या दोन इतर हाय-प्रोफाइल प्रकल्पांसाठीही उप-सल्लागार आहे. इनोव्हेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हॉईसर प्रा. लि.या कंपनीला या तीन प्रकल्पांसाठी 2018 ते 2020 दरम्यान उप-सल्लागार नियुक्त केले होते. मात्र सत्यजित देशमुख यांनी इनोव्हेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हॉईसर प्रा. लि. ही कंपनी कोणताही प्रकल्पासाठी सल्लागार नव्हती, असे निवेदनात म्हटले आहे. ईडी याच तीन प्रकल्पांमध्ये इनोव्हेव इंजिनिअरिंग अँड ऍडव्हॉईसर प्रा. लि. या कंपनीने १०.९ कोटी रुपयांचा व्यवहार केल्याप्रकरणी चौकशी करत आहे.

(हेही वाचा हिजाब तूर्तास घालू नका! उच्च न्यायालयाचा आदेश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.