जॅकलीन अडकली ईडीच्या जाळ्यात… काय आहे आरोप?

79

सध्या अनेक नेते मंडळी ईडीच्या वेढ्याला सामोरे जात असतानाच, आता ईडीच्या संशयाची काडी बॉलीवूड पर्यंत सुद्धा पोहोचली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आता ईडीच्या रडारवर आली आहे. दिल्लीत ईडीकडून तिची पाच तासांपेक्षा जास्त काळ चौकशी करण्यात आली आहे.

का होत आहे चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, करोडो रुपयांच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात जॅकलीन सहभागी असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे. खंडणीच्या रॅकेटमध्ये तिचे नाव समोर येत असून, या रॅकेटचा म्होरक्या सुकेश चंद्रशेखर असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या अभिनेत्रीचीही झाली होती चौकशी

जॅकलीन फर्नांडिसच्या आधी अभिनेत्री यामी गौतमची सुद्धा मनी लॉंड्रिंगच्या आरोपाखाली चौकशी करण्यात आली होती. 7 जुलै रोजी ही चौकशी करण्यात आली होती. तिच्यावर फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिचीही तपास यंत्रणेकडून अनेक तास चौकशी करण्यात आली होती.

या सिनेमाची आहे चर्चा

आगामी काळात जॅकलीनचा भूत पोलिस हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमात जॅकलीन सोबत यामी गौतम सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे. तर सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.