ईडीच्या रडारवर मल्लिकार्जुन खर्गे; ‘या’ प्रकरणी चौकशी सुरु

117

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे आता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल हेरॉल्ड भ्रष्टाचार प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी सुरू केली आहे. त्यांना सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. सन २०१२ मध्ये भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयासमोर ही तक्रार दाखल केली होती.

काय केली सुब्रमण्यम स्वामींनी तक्रार?

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयासमोर असा आरोप केला होता की, काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षनिधीतून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची कंपनी यंग इंडियाला ९० कोटी रुपये उधार दिले होते. या पैशातून राहुल आणि सोनिया यांच्या कंपनीने नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमान पत्र चालवणारी कंपनी असोसिएट जनरल खरेदी केली होती. यानंतर या कंपनीची ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती अद्यापही गांधी कुटुंबियांकडे आजही असल्याचे सांगितलं जात आहे.

(हेही वाचा – ‘शिवतीर्था’वरील ‘बाळ’ ठाकरेंना तुम्ही पाहिले का?)

उच्च न्यायालयाने काँग्रेसकडून मागितले होते उत्तर

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीनुसार, काही काँग्रेसी नेते यंग इंडियन लिमिटेडद्वारे एसोसिएटेड जर्नल्सच्या अधिग्रहणात फसवणूक करणे आणि विश्वासघातात सहभागी होते. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची सुरुवात माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. स्वामी यांनी या प्रकरणात सोनिया गांधी, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्या नावाचा उल्लेख केला होता. यानंतर फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या उच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर आरोपींकडून यासंदर्भातील उत्तर मागितले होते. यानंतर न्यायाधीश सुरेश कैत यांनी गांधी कुटुंबाला नोटीस देताना अखिल भारतीय काँग्रेस महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया यांनी १२ एप्रिलपर्यंत स्वामी यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.