‘उबाठा’ गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड (ED Raid) पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. के के ग्रँड या चेंबुरमधील इमारतीत ११ व्या मजल्यावर सूरज चव्हाण राहतात. या ठिकाणी ईडीनं धाड टाकली आहे. ईडीचे पाच अधिकारी सूरज चव्हाण यांच्या घरी दाखल झाले असून सध्या चौकशी सुरु आहे.
सध्या सुरज चव्हाण यांच्या इमारतीबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. ईडीचा विरोध (ED Raid) करत आहेत.
अशातच सनदी अधिकारी संजीव जैसवाल यांच्या घरी देखील ईडीने धाड (ED Raid) टाकली आहे. एकूण १० ठिकाणी ईडीने कारवाई केली आहे.
(हेही वाचा – “मी मोदींचा फॅन”, एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये ईडीनं धाड (ED Raid) टाकली आहे. सुजित पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला देण्यात आलं होतं. पण या कंपनीने घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणी आता ईडी तपास करत आहे.
कोरोना घोटाळा प्रकरणी राज्य शासनानं एसआयटी गठीत केली आहे. यामार्फत चौकशी केली जाणार आहे. त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांनी काल घेतलल्या पत्रकार परिषदेत १ जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आज ईडीने (ED Raid) केलेली कारवाई यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community