शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे अधिकारी रविवारी पहाटे संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले. ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते आणि त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती.
( हेही वाचा : संजय राऊत यांच्याकडून महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ; ऑडिओ क्लीप व्हायरल )
ऑडिओ क्लिप प्रकरणी गुन्हा दाखल
दरम्यान राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिपच्या आधारे भारतीय कलम ५०७ अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्या ऑडिओ क्लिपची पुष्टी होऊ शकलेली नाही मात्र, व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेऊन महिलेची तक्रार दाखल झाली असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community