शिवसेना खासदार संजय राऊत यांची गेल्या पाच तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू आहे. मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणात सकाळी सव्वासात वाजल्यापासून ईडीचे १० अधिकारी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी चौकशी करत आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या दादरमधल्या घरातही ईडीने छापा टाकला आहे.
( हेही वाचा : Sanjay Raut ED Raid : काय आहे पत्राचाळ घोटाळा? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण )
दादरमधल्या घरीही ईडीचा छापा
ईडी कार्यालयाबाहेर आणि संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ईडीचे दिल्लीचे अधिकारी सुद्धा मुंबईत दाखल झाले आहेत. ईडी कार्यालयाबाहेरच्या हालचाली वाढल्याने राऊत यांना अटक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच नवनीत राणा आणि शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी एवढी मोठी ईडी धाड पडल्यावर १०१ टक्के अटक होणार असा दावा केला आहे.
संजय राऊतांची ईडी अधिकाऱ्यांकडून भांडुप येथील घरी चौकशी सुरू असतानाच आता दादर मधील फ्लॅटवरही अधिकारी पोहचले आहेत. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community