शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे अधिकारी रविवारी पहाटे संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले. यासंदर्भात भाजपच्या किरीट सोमय्यांनी ‘हिसाब तो देना पडेगा’ असे ट्वीट केले आहे.
( हेही वाचा : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; भांडुपच्या घरी ईडीचे पथक दाखल)
किरीट सोमय्यांचे ट्वीट
संजय राऊतांना अखेर हिसाब तो देना पडेगा, १२०० कोटींचा पत्राचाळ घोटाळा असो किंवा वसई नायगावमधील PACL घोटाळे असोत, माफियागिरी लोकांना धमकी देणे…संजय राऊतांना आपल्या भष्ट्राचाराचा, माफियागिरी, दादागिरीचा हिसाब तो देना पडेगा असे व्हिडिओ ट्वीट भाजपच्या किरीट सोमय्यांनी केले आहे.
संजय राऊत को हिसाब तो देना पड़ेगा pic.twitter.com/r5bPETWsV6
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 31, 2022
दरम्यान राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑडिओ क्लिपच्या आधारे भारतीय कलम ५०७ अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community