अनिल परब यांच्याशी संबंधित ‘या’ 7 ठिकाणांवर ईडीचे छापे

99

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे वरीष्ठ नेते अनिल परब यांच्याशी संबंधित ज्या ज्या ठिकाणी सध्या छापेमारी सुरु आहे. त्या जागा आणि मालमत्ता कोणत्या आहेत ते पाहूया.

या 7 जागांवर छापेमारी सुरु 

  • अजिंक्यतारा- अनिल परबांचे मंत्रालयाजवळील शासकीय निवासस्थान
  • मोनार्क इमारत- अनिल परब यांचे वांद्रे पूर्वमधील खासगी निवासस्थान
  • अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या बांधकाम व्यावसायिकाच्या घरी ईडीचे छापे
  • दापोलीमधील साई रिसोर्ट परबांना विकणा-या साठेंच्या घरीदेखील छापेमारी सुरु
  • दापोलीमधील साई रिसोर्ट येथेही छापेमारी सुरु
  • विभास साठे यांच्या कोथरुडच्या घरीदेखील ईडीची छापेमारी

हा आहे आरोप

कोट्यावधींची रक्कम घेऊन पोलिसांच्या बदल्या केल्या गेल्याचा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर करण्यात आला होता. मुंबई आणि कोकण विभागातील पोलिसांच्या बदल्या या अनिल परब यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांची चौकशी सीबीआयकडून सुरु होती.  या चौकशीसाठी ईडी छापेमारी करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.