राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. याचवेळी हसन मुश्रीफ यांच्या कन्या नाविदा मुश्रीफ यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली आहे. नाविदा यांच्या पु्ण्यातील घरी ईडीच्या टीमने छापेमारी केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात असणा-या अशोका सोसायटीमध्ये ईडीने ही छापेमारी केली आहे. बुधवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी या सोसायटीमध्ये दाखल झाले. ईडीच्या 5 अधिका-यांकडून नाविदा यांची चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
( हेही वाचा: हसन मुश्रीफांनंतर आता ‘या’ नेत्याने तयारीत राहावे; किरीट सोमय्यांचा इशारा )
सोमय्यांचा मुश्रीफांवर आरोप
हसन मुश्रीफ यांनी एकूण 158 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुश्रीफांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही किरीट सोमय्या यांनी केला आहे. विविध साखर कारखान्यांमध्ये घोटाळे झाले आहेत आणि ते सर्व घोटाळे इटंरलिंक आहेत, असे किरिट सोमय्यांचे म्हणणे आहे. केवळ हसन मुश्रीफच नाही तर अनिल परबही आहेत आणि त्यानंतर अस्लम शेख यांचा नंबर लागेल, अशी स्पष्टोक्ती किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत केली आहे.
Join Our WhatsApp Community