ED पुन्हा अ‍ॅक्शनमोडमध्ये! नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा

89

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या पथकाने दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर छापा टाकल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात हजर झाले असून त्यांनी त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणी यापूर्वी सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली असून मनी लाँड्रिंग प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे.

कागदपत्रांच्या शोधात ईडीने नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर हे छापे टाकले आहे. या दरम्यान 10 जनपथवर झालेल्या बैठकीच्या कागदपत्रांचाही शोध घेतला जात असून तपासणी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेकांच्या ठिकाणांसह लोकांवर छापेमारी होण्याची शक्यता आहे. ईडी सध्या नॅशनल हेराल्ड आणि नवजीवनच्या ऑफिस हेराल्ड हाऊसमध्ये छापा मारला जात आहे.

(हेही वाचा – शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराने उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवला, म्हणाले…)

यापूर्वी २७ जुलै रोजी ईडीने सोनिया गांधी यांची साधारण ११ तास चौकशी केली होती. ही चौकशी ३ तास चालली. या चौकशीदरम्यान, ईडीने सोनिया गांधींना हेराल्डशी संबंधित ४० हून अधिक प्रश्न विचारले होते. सोनियांपूर्वी ईडीने राहुल गांधींची साधारण ५० तासांहून अधिक चौकशी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.