आयएएस महिला अधिकाऱ्याकडे इतक्या नोटा सापडल्या की मोजायला मशीनच आणली!

103
झारखंडच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या २० ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे ५ वाजता छापे टाकण्यास सुरुवात केली. या दरम्यान सिंघल यांच्याशी संबंधित सीएकडून २५ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याच्या मशीन्स आणल्या.

पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानीदेखील ईडीचे पथक पोहोचले

जप्त रकमेबद्दलची अधिकृत माहिती ईडीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. पूजा सिंघल यांच्या घरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याची माहिती दिली. ईडीच्या पथकांकडून रांचीच्या कांके रोड येथील चांदनी चौक परिसरातील पंचवटी रेसिडेन्सीच्या ब्लॉक क्रमांक ९, लालपूरच्या हरिओम टॉवर आणि बरियातूमधील पल्स रुग्णालयात छापासत्र सुरू आहे. पल्स रुग्णालय पूजा सिंघल यांचे पती आणि व्यवसायिक अभिषेक झा यांचे आहे. पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे. पूजा सिंघल झारखंडच्या वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्याकडे सध्या उद्योग सचिव आणि खाण सचिव पदाचा प्रभार आहे. यासोबतच पूजा यांच्याकडे झारखंड राज्य खनिज विकास निगमच्या चेअरमन पदाची जबाबदारी आहे. राज्यात भाजपचे सरकार असताना त्या कृषी सचिव पदावर कार्यरत होत्या. मनरेगा घोटाळा उघडकीस आला, त्यावेळी त्या डीसी पदावर तैनात होत्या.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.