राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर ईडीकडून पुन्हा छापेमारी सुरू केली आहे. माहितीनुसार, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणात ईडीची ही छापेमारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
यापूर्वीही ईडीने हसन मुश्रीफांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा ईडीने याठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीत मुश्रीफांचे पुणे आणि कोल्हापुरातील निवासस्थान आणि कार्यालयांचा तपास केला जात आहे.
दरम्यान आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात पारदर्शक पद्धतीने व्यवहार होत नाहीत. तरीही २०२० साली तो ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. असे असूनही या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होतो.
(हेही वाचा – शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा भाऊ ईडीच्या ताब्यात; साई रिसाॅर्टप्रकरणी कारवाई)
Join Our WhatsApp Community