आता शिवसेना नेते आनंदराव अडसुळांचाही मुलगा, जावई गोत्यात!

मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने आनंदराव अडसूळ यांच्यावर कारवाई केली.

74

सध्या ईडीचा फास राजकीय नेत्यांच्या सगळ्या घरादाराला भोवती आवळला जातो, त्यामुळे भल्या भाल्यांची बोलती बंद होत आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांची मुले असो कि एकनाथ खडसेंचे जावई सगळे जण ईडीच्या ससेमिऱ्या समोर गलितगात्र बनले आहेत. आता वेळ शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांची आली आहे. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अडसूळ यांच्याविरोधात कारवाया सुरु केल्या असून त्यांचा मुलगा आणि जावई दोघांच्या निवासस्थानी ईडीने अचानक धाडी टाकल्या आहेत.

न्यायालयात माझ्या प्रकरणावर नवनीत राणा यांच्याविरुद्ध बनावट जात प्रमाणपत्र विषयी असलेली याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आली असताना त्यादिवशीही जाणीवपूर्वक ईडीचे अधिकारी माझ्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. केंद्राकडून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्यांच्या प्रेमापोटी वापरण्यात येणाऱ्या दबावतंत्राला मी घाबरणार नाही. आमदार राणाद्वारे कथितरित्या पसरविल्या जाणाऱ्या बातम्यांना बळी पडू नये आणि माध्यमांनीही जनतेसमोर वस्तुस्थिती ठेवावी.
– आनंदराव अडसूळ, माजी खासदार, शिवसेना

९०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींचा घोटाळा झाल्याप्रकरणी तक्रारीच्या अनुषंगाने ईडीने अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांचा माजी आमदार मुलगा व जावई यांच्यावर ही कारवाई केल्याची  माहिती आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार केला असून सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेन्शनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम, गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप ईडीकडे नोंदविलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. त्याआधारे ईडीने अडसुळांसह माजी आमदार तथा बँकेचे संचालक अभिजित अडसूळ व जावई यांची घरे, कार्यालयांची झाडाझडती घेतली. ईडीला चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे.

(हेही वाचा : महाराष्ट्रातून मी निघून गेल्यास राज्याचेच नुकसान! सांगलीत राज्यपालांची फटकेबाजी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.