शिवसेनेला आठवले गांधी

113

राज्यात महाविकास आघाडीचे नेते, मंत्री आणि आमदार यांच्यावर विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई होत आहे. त्यानुसार शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही ईडीने मंगळवार, ५ एप्रिल २०२२ रोजी कारवाई केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांना चक्क मोहनदास करमचंद गांधी आठवले.

शिवसेनेचे माजी खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबाग येथील ८ भूखंड आणि दादर येथील फ्लॅटची जप्ती करण्यात आली आहे. १ हजार १०४ चौ. मीटर भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा संजय राऊतांना ईडीचा दणका! मुंबई,अलिबागमधील संपत्ती जप्त)

गांधीजी पुन्हा मरण पावले

यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, माझे सगळे कुटुंब ज्या दादरच्या घरात राहते, त्या घरावर जप्ती केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा किती बेकायदेशीरपणे काम करत आहेत, हे यावरून दिसते. माझे सगळे कुटुंब खंबीर आहे. माझ्या डोक्याला बंदूक लावा, मी मरायला तयार आहे, संजय राऊत खोटेपणाला घाबरत नाही, तुम्ही तुमची कबर खोदायला घेतली आहे. मराठी माणसावर तुम्ही कारवाई करत आहात, पण हा मराठी माणूस आमच्या बाजूने आहे. राक्षसांचाही अंत झाला आहे, रावण, कंस सगळे मरण पावले आहेत. मी लढणारा माणूस आहे, मालमत्ता, संपत्ती आमच्यासाठी गौण आहे. मी कशाला मौनात जाऊ, मी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत ३० वर्षे होतो, दररोज सकाळी मी मॉर्निंग वॉकला जातो, माझा हिरेन पांड्या करा, मला गोळी झाडा. भाजपच्या नेत्यांच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केल्यावर लगेच कारवाई केली आहे. असत्यमेव जयते, गांधीजी पुन्हा मरण पावले, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.