कारवाईनंतर शरद पवारांचा राऊतांना फोन! काय म्हणाले पवार?

129

मी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे माझ्यावर अशी कारवाई होणार याची मला माहिती होती, उद्या मला अटकही होईल. ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला फोन आला होता, ते म्हणाले, ‘काय सुरू आहे, मी तुमच्यासोबत आहे’, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आधीच ईडीने राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत यांना अटक केली आहे, आता त्याबरोबर संजय राऊत यांच्यावर कारवाई करायला सुरूवात झाली आहे. त्यानुसार ईडीने मंगळवार, ५ एप्रिल २०२२ रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई केली. राऊत यांचे अलिबाग येथील ८ भूखंड आणि दादर येथील फ्लॅटची जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. १ हजार १०४ चौ. मीटर भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा शिवसेनेला आठवले आता गांधी)

म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न

मी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत होतो. त्यामुळे माझ्यावर अशी कारवाई होणार याची मला माहिती होती, उद्या मला अटकही होईल. ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा मला फोन आला होता, ते म्हणाले, काय सुरू आहे, मी तुमच्यासोबत आहे. सरकार पाडण्यासाठी मी सहकार्य करत नाही, म्हणून मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल, तर जरूर करा, माझे सगळे कुटुंब त्या दादरच्या घरात राहते, केंद्रीय तपास यंत्रणा किती बेकायदेशीरपणे काम करत आहे, हे दिसते, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा संजय राऊतांना ईडीचा दणका! मुंबई,अलिबागमधील संपत्ती जप्त)

(हेही वाचा याची कल्पना होती, मला अटकही होईल!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.