संजय राऊत म्हणतात… याची कल्पना होती, मला अटकही होईल!

131

ईडीने मंगळवार, ५ एप्रिल २०२२ रोजी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई केली. मी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत होतो. त्यामुळे माझ्यावर अशी कारवाई होणार याची मला माहिती होती, उद्या मला अटकही होईल, अशी शक्यता राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

राज्यात महाविकास आघाडीचे नेते, मंत्री आणि आमदार यांच्यावर विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई होत आहे. आता ही कारवाई शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही कारण्यात आली आहे. ईडीने मंगळवार, ५ एप्रिल २०२२ रोजी राऊत यांचे अलिबाग येथील ८ भूखंड आणि दादर येथील फ्लॅट जप्त केल. १ हजार १०४ चौ. मीटर भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा शिवसेनेला आठवले आता गांधी)

तर सगळी संपत्ती भाजपच्या नावावर करेन

मला याची कल्पना होती, ज्या प्रकारे हे सरकार आम्ही स्थापन केले आहे, त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा होती. या कारवायांमुळे संजय राऊत, शिवसेना खचली आहे, हे कधीच होणार नाही. आज जी संपत्ती ते दाखवत आहेत, ती कष्टाने मिळवली आहे. चुकीच्या मार्गाने मिळवलेला एक रुपया जरी माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावावर असेल तर सगळी संपत्ती आम्ही भाजपच्या नावावर करू, ते भिकारी लोक आहेत. हा सूड आहे. राहत्या घरातून आम्हाला बाहेर काढले. कायद्याने राहते घर जप्त करण्यासाठी आम्हाला कळवले पाहिजे होते, दादरच्या घराविषयीचा व्यवहार प्रतिज्ञापत्रात दिला आहे, असेही राऊत म्हणाले. मला पत्राचाळ कुठे आहे हे माहीतच नाही. प्रवीण राऊत यांच्या आरोपपत्रात काहीही टाकू शकतात. नीरव मोदी याचा पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोटो होता, त्यामुळे नरेंद्र मोदी दोषी ठरू शकत नाहीत. आम्ही कायदेशीर लढाई लढूच, शेवटी आमच्या घामाच्या आणि कष्टाच्या जोरावर ही संपत्ती मिळवली आहे, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा संजय राऊतांना ईडीचा दणका! मुंबई,अलिबागमधील संपत्ती जप्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.