छत्तीसगडची (Chhattisgarh) राजधानी रायपूर (Raipur) येथील काँग्रेसचे (Congress) प्रदेश कार्यालय राजीव भवनात ईडी दि. २५ फेब्रुवारी रोजी दाखल झाली. ईडीने (ED) काँग्रेस (Congress) प्रदेश कार्यालयाला समन्स बजावले आहे. यामध्ये सुकमा-कोंटा येथे बांधलेल्या काँग्रेस कार्यालयाच्या इमारतीबाबत २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले आहे. इमारतीसाठी निधी कुठून आला, असा सवाल ईडीने केला आहे. बांधकाम कधी सुरू झाले आणि कंत्राटदार कोण आहे? यासोबतच त्याची संपूर्ण आर्थिक खर्चाची माहिती देखील ईडीने मागितली आहे.
( हेही वाचा : Crime : वडिलांच्या तिजोरीतील ३ कोटींच्या हिऱ्यांची चोरी, मुलाला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, अहवालात सांगण्यात आले आहे की, जर याबाबत समाधानकारक माहिती मिळाली नाही तर राजीव भवन (Rajiv Bhavan) आणि कवासी लखमा यांचा मुलगा हरीश लखमा (Harish Lakhma) यांचे घर जप्त केले जाऊ शकते. हे संपूर्ण प्रकरण माजी मंत्री कावासी लखमा आणि दारू घोटाळ्याशी संबंधित आहे. दि. २८ डिसेंबर रोजी ईडीने रायपूरमधील धर्मपुरा येथील माजी उत्पादन शुल्क मंत्री लखमा यांच्या बंगल्यावर छापा टाकला आणि कसून झडती घेतली. (Congress)
त्या काळात, लखमाचे जवळचे सहकारी सुशील ओझा (Sushil Ojha), हरीश लखमा (Harish Lakhma) आणि राजेश साहू यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली. यानंतर ईडीने कावासी लखमा यांची प्रत्येकी दोनदा ८ तास चौकशी केली. अखेर दि. १५ जानेवारी रोजी त्याला अटक करण्यात आली. घोटाळ्याबद्दल लखमा म्हणाले होते, “मी अशिक्षित आहे. अधिकारी मला जिथे सांगायचे तिथे मी सही करायचो. घोटाळा झाला आहे की नाही हे मला माहित नाही.” (Congress)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community