सध्या ईडीच्या कारवाईने महाविकास आघाडीतील मंत्री, आमदार आणि नेते रडारवर आहेत. ईडी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरात घुसली आहे. ईडीने सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे, पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील पुष्पक आणि नीलांबरी या दोन इमारतीतील ११ सदनिका जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्ता ६.४५ कोटीची आहे. २०१७ मधील प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
(हेही वाचा बहुतांश मजूर संस्थांवर अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे, कारवाई माझ्यावरच का? दरेकरांचा सवाल)
ED attaches properties worth Rs. 6.45 Crore in the demonetization fraud case by the Pushpak Group of companies
— ED (@dir_ed) March 22, 2022
चंद्रशेखर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचं दाखवलं. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
जर मुख्यमंत्र्याच्या नातेवाईकावर ईडी कारवाई करते, थेट ११ सदनिका जप्त करते. हे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे.
– नितेश राणे, आमदार, भाजप
सोमय्यांनी पाटणकरांवर काय केलेले आरोप
कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमिनीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी गेल्या जानेवारी महिन्यात केला होता. ”वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे. अशा या देवस्थानची जमीन गैरव्यवहार करून एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर केली. त्यानंतर ती जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर करण्यात आली”, असे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.
Join Our WhatsApp Community