मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. पाटणकर यांचे जवळपास साडे सहा कोटींचे ११ फ्लॅट्स ईडीने जप्त केले. आतापर्यंतची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पाठीमागे ईडी लागली होती. पण आता ईडीचे टार्गेट ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय आहेत. याच पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस महाराष्ट्रात ईडी अधिक सक्रीय दिसत आहे, हे पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी, सकाळी ११ वाजता मंत्रीमंडळ बैठक बोलावली आहे.
ठाकरे सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच सध्या बिनखात्याचे मंत्री असलेले नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले होते. एकंदरित दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांबाबत बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.
(हेही वाचा मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर काय आहेत आरोप?)
उद्या कॅबिनेट बैठकीचे आयोजन
पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या घरावर आयकर विभागाने धाडी मारल्यानंतर आता थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरच ईडीने कारवाईचे हत्यार उपसले आहे. सरकारमधील मोठ्या नेत्यांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी शंका महाविकास आघाडीचे नेते उपस्थित करत आहेत. तसेच या प्रकाराविरोधात आपल्याला सडेतोड उत्तर देण्याची गरज असल्याचे महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी, सकाळी ११ वाजता कॅबिनेट बैठकीत केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती कळत आहे.
Join Our WhatsApp Community