मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर काय आहेत आरोप?

124
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या मालमत्तांची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. 

श्रीधर पाटणकर यांच्यावर नेमके आरोप काय?

शेल कंपनीच्या मालकांनी पाटणकरांना विनातारण ३० कोटी रुपये दिल्याचा आरोप श्रीधर पाटणकर यांच्यावर आहे. नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एन्ट्री ऑपरेटर असून त्याच्या माध्यमातून ३० कोटींचे कर्ज साईबाबा गृहनिर्मीती प्रा.लिमिटेड यांना शेल कंपन्यांच्या माध्यमातून ट्रान्सफर केले गेले, असा आरोप ईडीने ठेवलेला आहे. या ट्रान्सफर केलेल्या पैशातूनच या ११ सदनिकांची खरेदी केली गेली, असे बोलले जात आहे.

कोण आहेत श्रीधर पाटणकर?

  • श्रीधर पाटणकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत
  • श्रीधर पाटणकर रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत
  • श्रीधर पाटणकर बिझनेसमन आहेत
  • पाटणकरांच्या ठाणे येथील निलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका ईडीकडून जप्त
  • पुष्कप ग्रुप ऑफ कंपनीच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात पाटणकर यांचं नाव
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.