Patra Chawl Case: संजय राऊतांची पत्नी वर्षा यांना ED चे समन्स

120

पत्रा चाळ जमीन प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने समन्स बजावले आहे. वर्षा राऊतच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीकडून हे समन्स जारी करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Indian Railway: आता चालत्या ट्रेनमध्ये मोटरमनला डुलकी लागली तरी नो टेन्शन! कारण…)

वर्षा राऊत यांनी चौकशीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालायत हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांच्या अडचणी संपतना दिसत नाही. गुरूवारी संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या दरम्यान पत्राचाळ जमीन प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने आज समन्स बजावले आहे. यानंतर वर्षा राऊतांच्या खात्यावर काही व्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. वर्षा राऊत यांच्या बँकेतून १ कोटी ६ लाख अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत आणि वर्ष राऊत यांची चौकशी करण्यासाठी ईडीने वर्ष राऊत यांना समन्स पाठवले आहे. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून अनेक व्यवहार झाले असून त्याबाबत ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.