ED Summons : भावना गवळी हाजीर हो …ईडीकडून चौकशीसाठी समन्स

130

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले आहे. पुढच्या आठवड्यात हजर राहण्याचे ईडीने समन्स बजावले आहे आणि गैरहजर राहिल्यास ईडीकडून अजामीनपात्र वाॅरंट जारी करण्यात येऊ शकते. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील मनी लाॅंड्रींग प्रकरणात चौकशी सुरु आहे. या प्रकरणातच ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण

18 कोटी रुपयांच्या मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणी खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे कंपनीत रुपांतर करुन फायदा मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना याआधीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, ईडीकडून काही कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही भावना गवळी चौकशीसाठी गैरहजर राहिल्या.

( हेही वाचा: गणपतीला गावाला जाताय? कोकणातील गाड्यांचे बुकिंग फुल्ल )

कोण आहेत भावना गवळी

भावना गवळी या दिवंगत खासदार पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. त्या पुडंलिक गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. पुंडलिक गवळी यांनी सुरवातीपासूनच आपल्या चारही मुलींना प्रोत्साहन दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी राजकारणात प्रवेश केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.