झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ( Hemant Soren) यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं आहे. अवैध उत्खनन प्रकरणात त्यांना हे समन्स पाठवण्यात आलं आहे. हेमंत सोरेन यांना गुरुवारी, (11 जानेवारी) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेमंत सोरेन सक्तवसुली संचालनालयाचे (ED) ७ समन्स टाळले. त्यामुळे झारखंड सरकारने सर्व विभागांना केंद्रीय यंत्रणांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देऊ नयेत किंवा कोणतीही कागदपत्रे थेट त्यांच्याकडे देऊ नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. झारखंड सरकारने अपूर्ण माहिती हस्तांतरित केली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रक्रिया सुव्यवस्थित करत असल्याचं म्हटलं आहे.
राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये सायबर क्राईम पोलीस ठाणे
राजधानी रांचीमध्ये ताज हॉटेलच्या बांधकामासाठी 6 एकर जमीन भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आली. कोअर कॅपिटल एरिया साइड वन ताज हॉटेलवर पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये सायबर क्राईम पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रांची, बोकारो, लातेहार, हजारीबाग, रामगड, दुमका, सरायकेला खरसानवा, चाईबासा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, एका प्रस्तावात, धार्मिक स्थळाला वेढा घालण्यासाठी ST/SC/मागास/अल्पसंख्याक विभागाकडून 50 लाख रुपयांपर्यंतची मंजुरी देण्यात आली आहे.
हेही पहा –