प्रफुल्ल पटेलांच्या घरावर ईडीची कारवाई

129

इक्बाल मिर्ची प्रकरणी ईडीने एनसीपीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई केली. गुरुवारी, २१ जुलै रोजी ईडीने वरळी येथील प्रफुल्ल पटेल यांच्या फ्लॅटसचा ताबा घेतला आहे.

ईडीने फ्लॅट्स ताब्यात घेतले 

वरळी येथील जागा मिर्चीने खरेदी केली होती. त्यावर बांधकाम व्यावसायिकाने इमारत बांधली, त्यामध्ये अनेकांनी मनी लॉण्डरिंच्या माध्यमातून पैसे गुंतवले होते. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल हे एक होते. त्यांचेही या इमारतीत फ्लॅट आहेत. सध्या या फ्लॅट्समध्ये पटेल यांचे नातेवाईक राहत आहेत. ईडीने याआधीच मिर्चीची मालमत्ता ताब्यात घेतली होती. त्याअनुषंगाने प्रफुल्ल पटेल यांचेही नाव समोर आले होते. त्यानुसार ईडीने गुरुवार, २१ जुलै रोजी प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील इमारतीतील मालमत्तेवर कारवाई केली. ईडीने हे फ्लॅट्स ताब्यात घेतले आहेत. ईडीच्या कारवाईमुळे आता फ्लॅट्समध्ये पटेल यांचे नातेवाईक राहू शकतात मात्र पटेल यांना आता हे फ्लॅट्स विकता येणार नाही.

(हेही वाचा मुंबईकरांनो, असे आहे ११ मेट्रो प्रकल्पांचे Status, कोणती मेट्रो कधी होणार सुरु?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.