शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर ईडीची मोठी कारवाई; जालन्यातील कारखान्याची जमीन जप्त

96

शिवसेना नेते अर्जून खोतकर यांच्यावर सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने मोठी करावाई केली आहे. जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याची यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे.

( हेही वाचा: 2002 गुजरात दंगल प्रकरणः मोदींच्या विरोधातील याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय )

2019 ला एफआयआर 

गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 26 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ED ने PMLA अंतर्गत तपास सुरु केला आहे. हा एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्ट 2019 च्या आदेशानुसार, नोंदवण्यात आला होता.

ईडीने पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले होते की, मेमर्स जालना सहकारी कारखान्याची स्थापना 1984-85 मध्ये सुमारे 235 एकर जमिनीवर करण्यात आली होती. ज्यात 100 एकर जमीन महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय प्राप्त झाली होती. MSCBकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात कारखाना अयशस्वी ठरला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.