अजित पवारांची ‘ती’ इच्छा लवकरच पूर्ण होणार; केसरकरांचे विधान

80

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) येऊन सहा महिन्यांहून अधिकचा काळ लोटला. तरीदेखील सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. त्यामुळे याच मुद्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी टीकास्त्र डागले.

शिंदे-फडणवीस सरकारच्या या कार्यकाळात मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. यावरुन शिंदे गटाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मोठे विधान केले. मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, ही अजित पवार यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल, अजित पवार आमचे मित्र आहेत. आम्ही त्यांचे ऐकतो, असे वक्तव्य केसरकर यांनी केले आहे. ते सिंधुदुर्ग (Sindhudurg)येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

( हेही वाचा: संजय राऊतांचे आरोप म्हणजे नापासाची मार्कशीट असलेल्यांनी अभ्यासाचे तत्वज्ञान सांगण्यासारखे; सुधीर मुनगंटीवारांचा टोला )

केसरकरांकडून विकास कामांची पाहणी

दीपक केसरकर यांनी कोल्हापूरमध्ये सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले, मुंबईची ज्या वेगाने प्रगती होत आहे, तशीच प्रगती आम्ही कोल्हापूरची करत आहोत. महालक्ष्मी मंदिराजवळ आम्ही सगळ्या सुविधा निर्माण करत आहोत. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वर्षे रेंगाळलेले शाहू मिलमधील स्मारक आम्ही सुरु करत आहोत. शाहू पुलाजवळ पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करुन देत आहोत. पर्यटनाच्यादृष्टीने भारताच्या नकाशावर जयपूरचे जे स्थान आहे, तेच स्थान कोल्हापूरचे पुढच्या काळात असेल, असे केसरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.