प्रभावी लसीमुळे साथीच्या रोगांचा प्रभाव कमी – डॉ. मनसुख मांडवीय

197
Yoga in Asian Games ? आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय योगाला स्थान मिळणार?

नव्याने उद्भवणाऱ्या विषाणूंविरोधात लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्वाचे असून, जी-२० हे, सरकारी संशोधन संस्था, औषध उत्पादक कंपन्या आणि इतर भागाधारकांमध्ये सहकार्य निर्माण करण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरेल, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केले.

प्रभावी लसींचा विकास आणि अंमलबजावणीमुळे साथीच्या रोगांचा प्रभाव कमी व्हायला मदत होईल आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संशोधनाच्या प्रयत्नांना प्राधान्य द्यायला हवे असे आवाहन केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले.

(हेही वाचा – नागपूरचे एम्स एनएबीएच मान्यता प्राप्त करणारे देशातील प्रथम रुग्णालय ठरले; प्रधानमंत्री मोदींनी केले अभिनंदन)

“कोविड-19 महामारीने लस संशोधन आणि विकासामध्ये जागतिक सहकार्याचे महत्त्व दाखवून दिले आहे. शतकांमधून एकदाच येणाऱ्या या आरोग्य संकटामधून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करत असतानाच, आपल्याला विशेषतः नव्याने उद्भवणाऱ्या विषाणूंविरोधातल्या (रोग-जनक) लस विकासाला गती देण्यासाठी संशोधनाचे महत्त्व समजले आहे.“ असे केंद्रीय केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.

शनिवारी हैदराबाद येथे, “लस संशोधन आणि विकास: भविष्यातील आरोग्य विषयक आणीबाणी प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसादासाठी एकमत तयार करणे” या विषयावरच्या जागतिक लस संशोधन सहयोगी चर्चासत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते संबोधित करत होते. जी-२० आरोग्य कृती गटाची तिसरी बैठक रविवारी हैदराबाद इथे होत आहे त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.