‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण येणार! काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

140

‘पोर्नोग्राफी’वर नियंत्रण आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रीकरण यांच्या प्रभावामुळे लहान वयातच विकृत दृष्टीकोन तयार होतो. त्यातून लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात. ही विकृती रोखण्यासाठी पोर्नोग्राफीक मजकुरावर संपूर्ण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न असून यासाठी राज्यात प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याची माहितीही फडणवीसांनी बुधवारी दिली.

(हेही वाचा – दिशा सालियन प्रकरणाची SIT मार्फत होणार चौकशी, फडणवीसांची विधानसभेत घोषणा)

मुंबईत शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत विधान परिषदेच्या सदस्या उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, शाळेत झालेली ही घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू असून अशा विकृतींना आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सायबर गुन्ह्यांबाबत मिळालेल्या तक्रारीची तांत्रिक तपासणी कऱण्यासाठी राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन कऱण्यात आली आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, लैंगिक अत्याचारासंबंधी व्हिडिओ व अन्य मजकूर याबाबतची माहिती मिळाल्यावर समाजमाध्यमं व संकेतस्थळावरून हटवण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्यात येत आहे. राज्यात इंटरनेटवरील मजकुरावर आणि वेबसाईट प्रतिबंध घालण्याचे काम सुरू आहे. सायबर गुन्ह्यांबाबत गुप्तचर विभाग प्रकल्प प्रस्तावित आहे. या माध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता येईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.