PM Narendra Modi यांच्या मॉरिशस दौऱ्यादरम्यान आठ महत्त्वाचे करार

PM Narendra Modi यांच्या मॉरिशस दौऱ्यादरम्यान आठ महत्त्वाचे करार

40
PM Narendra Modi यांच्या मॉरिशस दौऱ्यादरम्यान आठ महत्त्वाचे करार
PM Narendra Modi यांच्या मॉरिशस दौऱ्यादरम्यान आठ महत्त्वाचे करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या मॉरिशस (Mauritius) दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाला मुख्य अतिथी होते. भारताच्या सुरक्षा दलातील एक तुकडीही या वेळी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाली. तसेच, नौदलाची एक युद्धनौका व हवाई दलाचे ‘स्काय डायव्हिंग’ पथक सहभागी झाले. भारत आणि मॉरिशसने द्विपक्षीय संबंधांना सामरिक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय बुधवारी (12 मार्च) जाहीर केला. (PM Narendra Modi)

हेही वाचा-धुळवडीच्या दिवशी Pune Metro ‘या’ काळासाठी राहणार बंद 

आपल्या मॉरिशस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दक्षिणेकडील देशांच्या (ग्लोबल साउथ) विकासाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सर्वांसमोर ठेवले. या दौऱ्यात दोन्ही देशांत आठ वेगवेगळे करार करण्यात आले. हिंदी महासागरात चीनचा वाढता वावर पाहता मॉरिशसबरोबरील संबंधांना भारताने महत्त्व दिल्याचे मानले जात आहे. दोन्ही देशांत सीमापार व्यवहार करताना राष्ट्रीय चलनाचा वापर, समुद्रातील माहितीचे आदानप्रदान करणे, पैसा गैरव्यवहाराला संयुक्तपणे सामोरे जाणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्याोगांमध्ये (एमएसएमई) सहकार्य वाढविणे अशा विविध क्षेत्रांचा करारामध्ये समावेश आहे. (PM Narendra Modi)

हेही वाचा-BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ

मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम (Navinchandra Ramgulam) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मोदी यांनी ‘ग्लोबल साउथ’च्या विकासाचे नवे उद्दिष्ट मांडले. त्याला ‘म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अॅक्रॉस रिजन्स’ अर्थात ‘महासागर’ असे नाव दिले. हिंदी महासागरात चीनचा (China) सातत्याने प्रभाव निर्माण करण्याच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर या नव्या धोरणाला महत्त्व आहे. मोदींनी २०१५मध्ये मॉरिशस भेटीत ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन’ अर्थात ‘सागर’ या धोरणाची घोषणा केली होती. (PM Narendra Modi)

हेही वाचा-विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ॲप विकसित करणार; शालेय शिक्षणमंत्री Dada Bhuse यांची माहिती

पंतप्रधान मोदींनी विविध विकासकामांचीही या वेळी घोषणा केली. मॉरिशसचे ५० कोटी रुपयांचे विविध विकास प्रकल्प राबविले जाणार आहे. अटलबिहारी वाजपेयी लोकसेवा आणि नवनिर्मिती संस्था उभारणीसाठीही दोन्ही देशांनी या वेळी कटिबद्धता व्यक्त केली. (PM Narendra Modi)

  • तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानातून सहकार्य
  • सवलतीत कर्जे आणि अनुदाने
  • मॉरिशसमधील नव्या संसदेच्या इमारतीच्या उभारणीमध्ये भारताचे सहकार्य
  • मॉरिशसच्या तटरक्षक दलाला आवश्यक ती सर्व मदत.
  • मॉरिशसमध्ये राष्ट्रीय सागरी माहिती केंद्र आणि पोलिस अकादमी स्थापन करण्यासाठी भारताचे सहकार्य
  • स्थानिक चलनात परस्पर व्यापार
  • मेट्रो एक्स्प्रेस, सर्वोच्च न्यायालयाची इमारत, आरामदायी निवासासाठी सामाजिक गृह आणि ईएनटी रुग्णालय उभारण्यासाठी भारताचे सहकार्य

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.